रोजच्या पूजापाठ मुळे मनुष्य मानसिक आणि अध्यात्मिक दृष्ट्या सकारात्मक राहतो. तरीही आयुष्यात अचानक आलेल्या नकारात्मक गोष्टीं किंवा संकटांचा प्रभाव कमी करण्यासाठी अभिषेक, होमहवन, यज्ञ, व्रतवैकल्य, कुलदैवताचे कुळाचार, तंत्र मंत्र केले जातात. पद्धती जरी वेगळ्या असल्या तरी सारांश एकच, त्या सर्वोच्च शक्तीला, त्या माय-बापाला शरण जाऊन लेकराच्या हक्काने ईच्छा मागणे, संकटातून मार्ग मागणे.
असाच एक पुरातन काळातील सोपा आणि अत्यंत परिणामकारक उपाय म्हणजे “संकटमोचक इच्छापूर्ती पोटली.” देवाला आणि कारक ग्रहांना प्रिय असलेल्या वस्तूंना बिजमंत्रानी अभिमंत्रित करून, सिद्ध करून मनोभावे ईच्छा व्यक्त केल्यास ती नक्की पूर्ण होते असे शास्त्रात सांगितले आहे. वेगळ्या भाषेत सांगायचे तर पुरातन काळापासून चालत आलेली हि एक Manifestation आणि Affirmations ची सहज सोपी पद्धत आहे.

"संकटमोचक इच्छापूर्ती पोटली"​​

या सर्व पोटलींमध्ये त्यांच्या प्रकारानुसार 11 ते 36 सामग्री आहेत. यात पुरातन काळातील तंत्र-मंत्र-यंत्र-सिद्धी तसेच आधुनिक Manifestation, Affirmation आणि Crystal Healing या तिन्ही प्रकारच्या साधना यांच्याशी संबंधित सामग्री असेल. या सर्व पोटली त्यांच्या प्रकारानुसार विविध बिजमंत्रानी सिद्ध केलेल्या आहेत. प्रामाणिक प्रयत्न करत राहणे गरजेचे आहेच. याला अध्यात्म आणि प्रार्थनेची साथ असेल तर फळ निश्चितच लवकर आणि चांगले मिळते.
पोटली सोबत वापरण्याच्या विधी संबंधित सूचना दिल्या जातील.

BRAMHAND SHAKTI ICON G

पोटली पूजा म्हणजे काय?

Manifestation (प्रकटीकरण किंवा ब्रह्मांडाकडे इच्छा व्यक्त करणे) ही संकल्पना सध्या आधुनिक आध्यात्मिक चळवळींमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे. परंतु, ही संकल्पना नवीन नाही. हिंदू धर्मात ती खूप पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. हिंदू धर्मातील मॅनिफेस्टेशन म्हणजे केवळ विचार करणे नव्हे, तर वैयक्तिक आत्मा आणि विश्वातील परमचेतना (ब्रह्म) यांच्यातील एकरूपता साधणे होय. ध्यान, मंत्रजप, प्रार्थना, आणि प्रतिकात्मक कृतींचा उपयोग वैयक्तिक ऊर्जांना विश्वातील शक्तींशी जोडण्यासाठी केला जातो. अशा अनेक प्राचिन विधींमध्ये “पोटली पूजा” हा एक प्राचिन व अनोखा विधी आहे, जो मॅनिफेस्टेशनच्या तत्त्वांवर आधारित आहे.
भारतीय संस्कृतीत ग्रह, तारे आणि त्यांचे आपल्या जीवनावर होणारे परिणाम महत्त्वपूर्ण मानले जातात. आणि त्यांचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी तसेच सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी विविध उपाय केले जातात. यामध्ये “ग्रह पूजेसोबत विशिष्ट वस्तू आणि क्रिस्टल्सच्या पोटलीची पूजा” हा एक प्रभावी उपाय मानला जातो.
पोटली म्हणजे “पिशवी” किंवा “गाठोडं,” आणि या पूजेमध्ये पवित्र वस्तूंसह तयार केलेल्या गाठोड्याचा उपयोग केला जातो. या वस्तू इच्छित उद्दिष्टांचे प्रतीक असतात. पोटली देवतेसमोर ठेवून प्रार्थना केली जाते, मनापासून इच्छाशक्ती व्यक्त केली जाते, कधी ती उच्चारली जाते, तर कधी अंतर्मनात धारण केली जाते आणि आशिर्वाद मागितला जातो.
पोटली पूजा मध्ये इच्छांची भौतिक प्रतिकृती तयार करून भक्त आपली इच्छाशक्ती भौतिक जगात दृढ करतो. पोटली स्वतःच भक्ताच्या विश्वासाची आणि एकाग्रतेची प्रतीक बनते, ज्यामुळे ती इच्छांशी आणि त्या पूजेच्या वेळी मागितलेल्या दैवी ऊर्जेशी सतत जोडलेली राहते.
“पोटली पूजा” हा विधी अधोरेखित करतो की मॅनिफेस्टेशन ही केवळ वैयक्तिक प्रयत्नांची गोष्ट नाही, तर ती व्यक्तीच्या प्रयत्नांचा आणि दैवी कृपेचा समन्वय आहे.
आजच्या वेगवान जीवनशैलीमध्ये, ध्यान किंवा विस्तृत विधींसाठी वेळ नसलेल्या लोकांसाठी, पोटली पूजा एक सोपी व प्रभावी साधना आहे. ती सहज करता येते आणि व्यक्तीच्या वैयक्तिक गरजेनुसार केली जाऊ शकते.